पालघर: आमच्याविरोधातील तक्रार मागे घ्या अन्यथा बघून घेऊ; फरार आरोपींच्या आदिवासी शेतकऱ्यांना धमक्या..!

0
334

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची लुबाडणूक प्रकरणातील फरार आरोपींकडून आता तक्रारदार आदिवासी शेतकऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आदिवासी शेतकऱ्यांनी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात गेले अनेक दिवस रिलायन्स गॅस पाईपलान बाधित शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १० आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यातील काही आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागले नसून ते अद्याप फरार आहेत. यातील काही फरार आरोपींनीच आता शेतकऱ्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली असून यामुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये दशहत पसरली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी निलेश गणपत पाटील, गणेश किसन आडगा आणि यासह संदीप नवसु भोईर या आणखी एका इसमाविरुद्ध आदिवासी शेतकऱ्यांनी धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. “आमच्याविरोधातील तक्रार मागे घ्या अन्यथा बघून घेऊ” असे म्हणून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली आहे.

जर अशाप्रकारे फरार आरोपी थेट तक्रारदारांना गावात येऊन धमकी देत असतील तर नक्कीच आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी भीती व्यक्त आहे. त्यामुळे या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here