MUMBAI e NEWS [मुंबई]:
मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर आहे. लहान मुलांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कोणत्याही स्थितीत वाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही असा आक्रमक पावित्रा घेतला. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात ५०% अनुदान वर्ग करण्यात येणार असल्याचे आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दोन दिवसांत वाडिया हॉस्पिटलचे अनुदान वर्ग करणार: महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकेकडे असणारे शिल्लक अनुदानापैकी ५०% अनुदान हे येत्या दोन दिवसात देण्यात येणार आहे. उर्वरित अनुदानाबद्दल देखील दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, अतिरिक्त बेड हे सरकारची व महापालिकेची परवानगी न घेता वाढवण्यात आल्याची व इतर काही गोष्टी आहेत ज्यावर स्पष्टता गरजेची आहे. रुग्णालय बंद होणार नाही असे महापौरांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तातडीने बैठक बोलावून तोडगा काढा – शर्मिला ठाकरे
रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत शर्मिला ठाकरे यांनी आपला पाठिंबा दर्शविला. “वाडिया हॉस्पिटल बंद झाल्यास गरीब, गरजू रुग्णांनी जायचे कुठे? मंत्री तसेच महापालिकेने तातडीन बैठक बोलवावी आणि या प्रश्नावर तोडगा काढावा. काहीही झाले तरी हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही” असे मत शर्मिला ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं – सचिन सावंत
मुंबईतील लाखो लोकांना जिवदान देणारे हे रुग्णालय सुरु राहणे गरजेच आहे. या स्थितीला कोण जबाबदार हे शोधण्यापेक्षा लवकरात लवकर निर्णय घेऊन हॉस्पिटल सुरु ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here