उत्तम आरोग्य सेवेच्या बाबतीत वोक्हार्ट हॉस्पीटल नेहमीच अग्रेसर..!

0
325

मुंबई : योगेश चांदेकर –
उत्तम आरोग्य सेवेच्या बाबतीत मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पीटल नेहमीच अग्रेसर ठरले आहे. कोरोना व्हायरस सारख्या विषाणुजन्य आजारावर प्लाझ्मा थेरपी चाचणी घेण्यास या रुग्णालयाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मान्यता मिळाली आहे. एप्रिलपासून ते आतापर्यंत सुमारे ५०० कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार या ठिकाणी करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी एक प्रयोगात्मक प्रक्रिया आहे. या उपचार पद्धतीत कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोनावर उपचार घेण्याऱ्या रुग्णास टोचला जातो तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटलने रक्तदात्यांकडून प्लाझ्मा गोळा केला असून लवकरच या चाचण्या सुरू होणार आहेत.

ड्रगकंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) नुकतीच प्लाझ्मा थेरपी चाचण्या सुरू करण्याच्या रुग्णालयाच्या अर्जाला मान्यता दिली आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये एका निरोगी व्यक्तीकडून आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकार शक्ती स्थालांतरीत करून रुग्णाचा आजार बरा करण्यास मदत करते. या थेरपीमध्ये कोरोना व्हायसरवर मात केलेल्या रुग्णाकडून गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी अ‍ॅंटीबॉडीज तत्वाचा वापर केला जातो. बरं झालेल्या रुग्णाच्या रक्तातील घटक आजारी रुग्णाच्या इम्युनसिस्टिमला बळ देतात. जगभरात कोणतेही प्रमाणित उपचार उपलब्ध नसल्याने, या आजारावर उपचार करण्यासाठी अनेक औषधे आणि थेरपी एकत्रितपणे वापरल्या जातात आणि ही प्लाझ्मा चाचणी त्या दिशेने एक पाऊल आहे, असे मुंबई सेंट्रलच्या वॉक्हार्ट हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे प्रमुख डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितले.

या प्लाझ्माथेरपीचा पूर्वी इबोला विषाणूचा सारख्या संसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जात आहे. त्या आधारावर आता ही चिकित्सा कोरोना सारख्या रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात असल्याचे मुंबई सेंट्रलच्या वॉक्हार्ट हॉस्पिटलच्या प्लाझ्मा चाचणीचे मुख्य अन्वेषक डॉ. बेहराम पारडीवाला अधोरेखित केले.

आम्ही रक्तपेढीशी करार केला आहे जेथे आमचे रक्तदात्यांनी त्यांचे प्लाझ्मा दान केले आहेत आणि चाचणी तसेच आवश्यकतानुसार हा प्लाझ्मा योग्य रूग्णांना देण्यात येईल. देणगीदाराची ओळख पटल्यानंतर आम्ही त्याची संमती घेतो आणि प्लाझ्मा डोनेशनसाठी रुग्णाला नेण्यापूर्वी एंटीबॉडीजची पूर्व तपासणी यासारख्या सर्व आवश्यक चाचण्या घेतल्या जातात. आम्ही प्रत्येक रक्तदात्यासाठी सुमारे 500 मिलीप्लाझ्मा संकलित करतो. शिवाय, व्यक्ती महिन्यातून एकदा प्लाझ्मा दान करू शकते, अशी माहिती वॉकहार्ट हॉस्पिटलच्या सेंटरचे प्रमुख डॉ. पराग रिंदानी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here