MUMBAI e NEWS:
पालघर – योगेश चांदेकर
पालघर सांकृतिक मित्रमंडळा तर्फे महिलांसाठी विनामूल्य सेल्फ डिफेन्स कॅम्पचे आयोजन १७ डिसेंबर २०१९ पासुन केले होते दि. २१/०१/२०२० रोजी त्याचा समारोप होता त्याप्रसंगी पालघरच्या नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला केदार काळे बोलत होत्या. आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या कि “एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, अत्याचार होतो तेव्हा समाज जागा होतो, आंदोलन करतो, मेणबत्त्या जाळतो. त्यापेक्षा महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे त्यासाठी त्यांना तज्ञ शिक्षकांकडून प्रशिक्षण मिळावे म्हणून हा पालघर सांकृतिक मित्र मंडळचे अध्यक्ष केदार काळे ह्यांचा कडुन एक छोटा प्रयत्न आहे. हे करण्यासाठी मुलींनी, महिलांनी योग्य आहार घेतला पाहिजे, घरचे जेवण जेवले पाहिजे, जंक फुड, चायनीज नको” असे मार्गदर्शन नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला केदार काळे यांनी केले.

१५३ महीला व मुलींनी हे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यासाठी राजु खान, उमंग राज व त्यांचे ७ प्रशिक्षक यांनी ह्या महिलांना प्रशिक्षण दिले. आज सर्व प्रशिक्षकांचा सत्कार नगराध्यक्ष यांनी केला. आज महिलांनी जे प्रशिक्षण घेतले त्याची प्रात्यक्षिक दाखवली. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या महिला व मुलींना प्रशस्तिपत्र देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष केदार काळे, विशांत पागधरे, चिराग देसाई, शशिकांत चौधरी या कार्यक्रमास उपस्थित होते.