नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी योगेश चांदेकर यांची निवड

0
377

मुंबई | नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट (महाराष्ट्र) राज्य या संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी मुंबई ई न्यूजचे विभागीय संपादक योगेश चांदेकर यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारणीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी यांनी योगेश चांदेकर यांची निवड केली. तसेच जेष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील व अमोल कोमावार यांची महाराष्ट्र सचिव पदी, संजय जगदाळे यांची पुणे जिल्हा व सुभाष माने यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दरम्यान संघटनेचे महासचिव चंद्रकांत शिंदे तसेच जेष्ठ पत्रकार राजेश प्रभू साळगावकर, किरण भोगले, रीतेंद्र म्हातुर या सर्वांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले. दरम्यान योगेश चांदेकर यांनी बोलताना पालघर जिल्ह्यातील जे पत्रकार कोरोबाधित तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत अशा पत्रकारांच्या नातेवाईक यांनी आपल्याशी संपर्क करावा. त्या पत्रकारांना केंद्र सरकारकडून जी मदत मिळते त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मदत करू असे आश्वासन दिले. तसेच जिल्ह्यातील पत्रकारांना विमा संरक्षण मिळेल याकरिता मी प्रयत्न करणार आहे असे चांदेकर यांनी सांगितले.

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट (महाराष्ट्र) राज्य ही संघटना असून पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नावर नेहमीच आवाज उठवला जातो. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम या संघटनेमार्फत केले जाते. राज्यातील पत्रकार कोणत्याही संघटनेचा सभासद असला तरी तो आपला पत्रकार बांधव आहे ह्या हेतूने त्याला मदत करणे हे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टचे ब्रीदवाक्य आहे.

याबरोबरच, संघटनेचे माजी सरचिटणीस राजेश प्रभू साळगावकर यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्याजागी जेष्ठ पत्रकार आणि ए.बी.पी माझाचे इनपुट संपादक चंद्रकांत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. योगेश चांदेकर आणि चंद्रकांत शिंदे यांच्या निवडीने सर्व मिडीया क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here