शिवाजीराव आढळराव पाटील आणि आ. शरद सोनावणेंची मुक्ताफळे, जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरूच

0
1838
अमोल कोल्हे Vs शिवाजीराव आढळराव पाटील

पिंपरी (१५ मार्च) : मी निधड्या छातीचा मराठा म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी पुन्हा जाती पातीचे राजकारण सुरू केल्याचे पहायला मिळत आहे. मला कुणी आव्हान देऊ नये असे म्हणत त्यांनी ही निवडणूक जातीवर लढवणार असल्याचा इरादा यातून व्यक्त केलाय. 

शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे ह्यांच्या नावाची घोषणा होताच ,आढळराव ह्यांनी प्रचार सभांना सुरवात केली आहे. यावेळी भोसरी मध्ये झालेल्या विजयी निर्धार सभेत, शिरूर लोकसभा मतदार संघातुन चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आपण सगळे विमानाने दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी अर्थात ईश्वराच्या पाया पडू. त्यांच्या पायावर शिरूर लोकसभेचा माथा ठेऊ आणि आढळरावांसाठी केंद्रीय मंत्री पद मागू असे संतापजनक वक्तव्य आमदार शरद सोनवणे ह्यांनी मतदारांसमोर करत मुक्ताफळेही उधळली.

आढळराव आणि आमदार सोनवणे ह्यांनी केलेल्या अशा खालच्या दर्जाच्या वक्तव्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील राजकारण तापणार हे निश्चित मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here