पालघर: बोईसरमधील त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण!

0
80

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील दलाल टॉवर भागात राहणाऱ्या त्या कोरोनाबधित रुग्णाच्या कुटुंबातील अन्य तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर रुग्णाचा मुंबई येथील प्रवास इतिहासातून कोरोना लागण झाली असू शकते. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.

दरम्यान रात्री उशिरा त्या रुग्णाला ठाणे शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांना बोईसरमधील टिमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नव्याने संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये 3 व 12 वर्षाच्या मुलांचा व 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नवीन तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रेसिंग सुरू असून लवकरच त्यांचे विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here