नवी दिल्ली | मोदी सरकारचे कुशासन म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. या आजाराशी लढण्यासाठी आता ते लवकरच टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.ट्विट करत मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी टीकेची तोफ डागली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, फक्त भारतामध्ये कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगसची नवी महामारी मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळे उदयाला आली आहे. लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. आता पंतप्रधान याविरोधात लढण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची लवकरच घोषणा करतील.
विरोधक कोरोना परिस्थितीवरून सतत मोदी सरकारवर टीका करत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून देशातील लसीकरण सुद्धा ठप्प झाले आहे. मोदींनी विदेशात लशी पाठवल्यामुळे लशीची कमतरता जाणवत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत भारतात कोरोनाच्या रोजच्या वाढीत घट झाली आहे, पण मृत्यूची संख्या कमी होत नाही. दुसरीकडे, देशातील बरीच राज्य लशीच्या टंचाईचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.
मुंबई ई न्यूज वेब टीम: वाचकहो आम्ही आपल्यासाठी बातम्यांसोबतच इतर महत्वपूर्ण दर्जेदार माहिती घेऊन येत असतो. 'आजीबाईचा बटवा' (aajibaicha batava)… Read More
डहाणू प्रतिनिधी - विनायक पवार: डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेती/वरोती ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांनी पेसाच्या निधीत भ्रष्टाचार केल्याची तक्रार… Read More
जव्हार प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे खु. येथे मुदतबाह्य सॅनिटायजर वाटपाबाबत प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने गट… Read More
डहाणू प्रतिनिधी : जितेंद्र पाटील - डहाणू तालुक्यात एका विद्यार्थ्यांचा गंजाड मणिपूर येथील खदानी मध्ये पोहायला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची… Read More
तलासरी प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्च महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत कृषी पतपुरवठा मतदार… Read More
पालघर प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने असलेल्या कासा-भराड सूर्या कालव्यामध्ये कल्लू ढाबा येथून वाहणाऱ्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत… Read More