पालघर: अज्ञाताने पेटवल्या दुचाकी; कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

0
425

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्हयातील विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात इसमाने रमेश देवजी गोंड यांच्या दुचाकी घरासमोरील शेडमध्ये लावलेल्या दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि. ०५ एप्रिल) पहाटे घडली आहे. याबाबत रमेश गोंड यांनी कासा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध दुचाकी पेटवून दिल्याची तक्रार दिली आहे.

कोंडगाव येथे राहणाऱ्या रमेश गोंड यांच्याकडे पॅशन प्रो व एक्टीव्हा स्कुटी या दोन दुचाकी आहेत. सोमवारी रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी दोन्हीही गाड्या घरासमोरील शेडमध्ये लावल्या होत्या. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास रबर जळण्याचा वास व काहीतरी जळत असल्याचा आवाज आल्याने रमेश यांनी पत्नीसह बाहेर येऊन पहिले असता त्यांना दुचाकी पेटल्याचे दिसले. घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करेपर्यंत एक गाडी आगीत पूर्णतः जळाली होती अशी माहिती त्यांनी फिर्यादीत दिली आहे.

या घटनेची फिर्याद कासा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे कोंडगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here