ब्रेकिंग: पालघर तालुक्यातील सफाळे भागातील एकाला कोरोनाची लागण; २०-२५ जणांशी संपर्क

0
416

पालघर -योगेश चांदेकर:

सफाळे भागातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. हा रुग्ण पालघर जिल्ह्यातील इतर कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांपैकी नसल्याची माहिती मिळते आहे. २०-२५ जण या रुग्णाच्या अतिजोखमीच्या सहवासात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा केली जात असून त्यांचे विलगीकरण केले जाणार आहे.

कासा उपजिल्हा रुग्णालय – ३९ लोकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह:

कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उर्वरित ३९ लोकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच कासा उपजिल्हा रुग्णालय येथे क्वारंटाईन केलेल्या १८६ लोकांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले असुन सर्वांना घरी पाठण्यात आले आहे. तसेच २ दिवस कासा उपजिल्हा रुग्णालय बंद ठेवून रुग्णालयाची साफ-सफाई करुन निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here