वाचा: ‘यामुळे’ होतंय ग्रामसेवकांचे विशेष कौतुक!

0
485

पालघर – योगेश चांदेकर:


कोरोना विषाणू मुळे दि . २३ मार्च २०२० पासुन संपुर्ण देशामध्ये लॉक डाऊन जाहीर केला आहे. अशावेळी हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या पुढे उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे. असेच मोल मजुरी करून पोट भरणाऱ्या २०० आदिम (कातकरी) कुटुबांची उपासमार होवू नये यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक हे जणू देवदूत बनून धावून आले आहेत. गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या या सेवकांनी गावाशी जुळलेले ऋणानुबंध संकटकाळात जपल्याने तालुक्यात सर्वत्र या ग्रामसेवकांचे कौतुक होत आहे.

निलेश जाधव, हितेंद्र विंदे, सुधिर पाटील, सखाराम सातवी, वासुदेव राठोड, मनोज इंगळे, मोहन पाचलकर, अशोक तेलोरे, सुहास लोहार, मधुकर जाधव, वसंत भोईर, छोटु बागुल, प्रमोद भोईर, सुनिल गायकवाड, विपिन पिंपळे, श्रीमती लता चौधरी, श्रीमती पुनम संखे, अर्चना जोंधळेकर या ग्रामसेवकांनी सामाजिक हितासाठी वर्गणी दिली आहे.
दि. ३ / ४ / २०२o रोजी खालील ग्रामपंचायतीना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात येणार आहे.
या वर्गणीतून रायतळी ५१ कुटुंब(कातकरी), सासवंद १७ कुटुब (कातकरी), धुंदलवाडी ५० कुटुंब (कातकरी), दह्याळे ५० कुटुंब (कातकरी), निंबापुर ३२ कुटुंब (कातकरी) यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

रायतळी -सकाळी ११. ३०, सासवंद- दुपारी १२ .३o, धुंदलवाडी – दुपारी १, दह्याळे – दुपारी २, निंबापुर – दुपारी २.३० असे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना योग्य ते नियोजन करण्याच्या सूचनाही मा . गट विकास अधिकारी, पंचायत समिती डहाणू यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here