पालघर – योगेश चांदेकर:
मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकजुटीने मोदींच्या कोरोना विरोधातील लढाईच्या निर्धाराला पालघरमधील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

रविवारी रात्री नऊ वाजताच नागरिकांनी ठिकठिकाणी, घराघरात मेणबत्त्या, पणत्या, दिवे पेटवून नऊ मिनिटे परिसर प्रकाशमान केला.

सोशल डिस्टन्सचे पालन करून नागरिकानी नागरिकांनी घरांच्या दारामध्ये, अंगणात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर दिवे लावल्याने सर्व परिसर उजळून गेला होता.

शहराबरोबरच ग्रामीण भागातील लोकांनी लोकांनी उत्स्फूर्तपणे दिवे लावले. अनेकांनी मशाली पेटवल्या, तर काही ठिकाणी मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश पाडून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

काही ठिकाणी मेणबत्त्या लावल्या, तर काहींनी टॉर्चच्या प्रकाशात मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. उत्साही मंडळींनी गॅलरीतूनच ‘भारत माता कि जय’ च्या घोषणा दिल्या.

शहर व परिसरातील पॉवर ग्रिडवर कोणताही परिणाम झाला नाही, असा अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here