पालघर: डहाणूतील सेंट्रल बँकेच्या बाहेर रांगा; सुरक्षिततेचे नियम गुंडाळले बासनात..!

0
461

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना ठीक-ठिकाणी त्याच उल्लंघन होताना दिसून येत आहे. डहाणू येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या बाहेर लोकांनी आज सकाळपासून मोठी गर्दी केली आहे. बँकेच्या बाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सोशल डिस्टेसिंगचा नियम देखील पाळण्यात येत नाही. बरेच लोक जनधन खात्यामंध्ये ५०० रुपये जमा झाले आहेत कि नाही याची खातरजमा करण्यासाठी आल्याचे समजले.

अगदी सकाळपासून बँक कर्मचारी येण्या अगोदरपासूनच या रांगा लागल्या आहेत. काही जण गॅस संपला आहे त्यासाठी पैसे काढण्यास आल्याचे कारण देताना आढळले तर काहीजण घरातील गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे काढण्याचे कारण देत होते. एकूणच काय तर लोक खबरदारीचे उपाय, सूचना पाळत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here