पालघर: हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करणार गृहमंत्र्यांचा पुनरुच्चार; वाचा पत्रकारपरिषदेतील महत्वाचे मुद्दे!

0
478

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून दोन साधू व त्यांच्या चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यानंतर संपूर्ण देशात त्यावर सर्वांनीच तीव्र नापसंती व्यक्त केली होती. आत्तापर्यंत या प्रकरणात ११६ आरोपींना (९ अल्पवयीन) अटक करण्यात पोलीसांना यश आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन व इतर 35 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीच्या कारवाई नंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अचानक घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी गडचिंचले हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याचा पुनरुच्चार केला.

गृहमंत्र्यांच्या भेटीची गुप्तता पाळण्यासाठी आज प्रसार माध्यमांना घटनास्थळी प्रवेश व चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच्या भेटीदरम्यान कासा पोलीस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळास भेट दिली. गृहमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकारी यांच्याखेरीज इतरांना काही अंतरावर पोलीसांकडून रोखण्यात आले होते. दरम्यान लॉक डाऊन दरम्यान महामार्गावर तपासणीसाठी असलेल्या पोलिसांनी साधूंची चौकशी केली की नाही? याबाबत ही यानंतर तपास होणार असून दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करू अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होत. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनिल भूसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, वसई विरार महानगरपलिकेचे आयुक्त गंगाथरण, पोलीस अधिक्षक गौरव सिंह, उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन आदि उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्रकार परीषदेतील महत्वाचे मुद्दे:

  • परप्रांतीयांसाठी सुरु केलेल्या मदत केंद्रात एक लाख 33 हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली
  • पालघर येथून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी वसई आणि डहाणू येथून विशेष रेल्वेगाड्या सोडल्या
  • राज्यात सुरु केलेल्या हेल्पलाइन नंबरला आत्तापर्यंत ८९१३ लोकांनी प्रतिसाद दिला
  • राज्यात 4 लाख 35 हजार जणांना होम क्वॉ रंटाईन करण्यात आले
  • विनाकारन फिरणारे लोक आता पर्यंत राज्यात 53 हजार 330 लोकांवर कारवाई त्यांच्याकडून 3 कोटी 56 लाख दंड वसुल करण्यात आला आहे
  • लॉकडाऊनच्या काळात राज्यातील कारागृहामध्ये कोरोनाचा संसंर्ग पसरू नये म्हणून राज्यातील 8 कारागृह क्वॉरंटाईन करण्यात आले
  • मुंबईच्या आर्थर रोड जेलमधे स्वयंपाकी कोरोना पॉजिटीव्ह आला होता
  • कैद्यांची गर्दी कमी व्हावी म्हणून 11 हजार कैदी दोन टप्प्यात सोडण्यात येणार आहेत.
  • मुंबई पुणे कामाला जाणारे लोकांच्या निवासाची व्यवस्था करणे चालू आहे.
  • गड़चिंचले येथे पाहणी केली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here