पालघर: कोरोनाचा ३रा बळी; ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ३४ वर..!

0
333

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर ग्रामीणसाठी आजचा दिवस चिंताजनक ठरला आहे, आत्तापर्यंत ४ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दिवस भरात पालघर ग्रामीण मध्ये रिपोर्ट प्राप्त झालेल्या नव्या चार कोरोना रुग्णांपैकी मुंबई येथील एका महिलेचा काल मुंबई येथे मृत्यू झाला आहे. पालघरमध्ये त्या परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या दोघांना तर डहाणू मधील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि मुंबई येथील रहिवासी असलेली ४६ वर्षीय महिला सायन मुंबई येथील रहिवासी असून कुटुंबासोबत यू पी कडे चालत निघाली होती. पालघर येथे सुंदरम शाळा परिसर येथे नातेवाईकांकडे दोन दिवस राहायला असताना सदर महिलेस श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे तिला ग्रामीण रुग्णालय पालघर येथे दाखल करण्यात आले होते. तसेच त्या महिलेची स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवल्यानंतर तिला सायन रूग्णालय मुंबई येथे संदर्भित करण्यात आले होते. मंगळवारी सायन रूग्णालय मुंबई येथे सदर रुग्णेचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. आज सदर महिला रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्या मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या १३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here