मुंबई ई न्यूज नेटवर्क – (पालघर – प्रतिनिधी) ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर चालणारे संघटन म्हणून शिवसेनेची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात ओळख आहे. सेनेच्या या ओळखीच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन पालघर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी समाजकारणाच्या माध्यमातून कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष व विद्यमान शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी कार्यरत आहेत. समाजकार्यातून त्यांनी आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे पण त्यांच्या कार्याला देखील आभाळ ठेंगणं दाखवणारं कार्य त्यांच्या मुलाकडून होत आहे. होय, २०१८ मध्ये वकिली शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या ज्ञानाच्या जोरावर अन ध्येयशक्तीने मुंबई उच्च न्यायालयात यशस्वी विधिज्ञ म्हणून काम करत असलेले एडव्होकेट कल्पेश जगदीश धोडी म्हणजे ‘बाप से बेटा सवाई’ असेचं म्हणावे लागेल. वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात अथवा एखाद्या खेड्यातील लोकांना मदत करत वाढदिवस साजरा करायचा असा त्यांचा गत पाच वर्षांपासूनचा उपक्रम. आज कल्पेश यांचा २९ वा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा मुंबई ई न्यूजने घेतलेला हा आढावा…

कल्पेश धोडी हे वकिली क्षेत्रातील एक उभरतं नावं. उच्च न्यायालयात अनेक केसेस मध्ये त्यांनी केलेल्या युक्तिवादामुळं ते सर्वांना ज्ञात आहेतच पण त्यांची ओळख इतक्यापुरतीच मर्यादित नाही. आपल्या वडिलांकडून मिळालेले समाजकार्याचे बाळकडू त्यांना काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रेरणा देत राहिले. त्यामुळेच त्यांनी वकिलीला सुरुवात करताच एक निश्चय केला तो म्हणजे ‘मिळालेल्या उत्पन्नातील ४० टक्के वाटा हा सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचा’. वरकरणी अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे निर्णय जाहीर करतात मात्र पुढे ते विसरून देखील जातात. वयाच्या तिशीत असणारे कल्पेश याला अपवादच ठरत नाहीत तर दिवसेंदिवस सामाजिक कामात वाढ करत, आपल्या कार्यातून इतर समवयस्क तरुणांच्या समोर ते आदर्श ठरत आहेत. मदतीची अपेक्षा ठेवून येणारा माणूस कोण, कुठल्या विचारांचा यापेक्षा गरजुंना मदत करणे हा मूळ विचार त्यांनी आजवर जपला आहे. तलासरी अन भूकंप हे नेहमीचंच ठरलेलं समीकरण. तलासरी भागातील अनेक लोकांना अन्नधान्य वाटप, आरोग्य सुविधा, पुस्तकं व वह्यावाटप यासारख्या उपक्रमांनी ते ज्ञात आहेत. अनेक कुटुंबातील लोकांना ते आपल्या घरातीलच एक व्यक्ती वाटतात. वसईतील अनाथाश्रमाला ते नेहमीचं भरीव मदत करत असतात.

कल्पेश यांचा सामाजिक काम करत असताना जास्तीत जास्त ओढा शैक्षणिक साहित्य वाटपाकडे असतो. “पालघर हा आदिवासी व दुर्गम भाग असणारा जिल्हा आहे. त्यामुळं शिक्षणापासून व शैक्षणिक सुविधांपासून वंचित मुलांचं प्रमाण जास्त आहे. माझ्या मदतीमुळे जर यांतील काहींच्या आयुष्यात सोनेरी दिवस आले तर पुढे हि मुलं देखील इतरांना मदत करतील. मी आज लावलेला मिणमिणता एक दिवा उद्याची मशाल बनू शकतो.” हे विचार म्हणजे इतक्या कमी वयात देखील असणारी त्यांची दूरदृष्टी आणि विचारांची परिपक्वताच म्हणावी लागेल.

आधार प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही योगदान
आधार प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या कार्यातही कल्पेश यांचं योगदान राहिलं आहे. गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाह कार्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आजवर सात हजार जोडप्यांचा विवाह या प्रतिष्ठानद्वारे लावून देण्यात आले आहेत. यासह अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, कोरोना लॉक डाऊन काळात गरजुंना अन्नधान्य वाटप, यांसह सॅनिटायझर, मास्क, फेस शिल्ड व इतर साहित्याचे वाटप करण्यात प्रतिष्ठानचा पुढाकार राहिला आहे.

यंदा वाढदिवस कोरोना योद्धयांसाठी मदत करून साजरा
कल्पेश दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक जाणिवेचा दिवस म्हणून साजरा करतात. वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात मदत देऊन त्यांच्यासोबतच ते केक कापून त्यांना आधार देत कुटुंबाप्रमाणे वर्षभर कल्पेश त्यांच्या संपर्कात असतात. यावर्षी कोरोना निर्बंधामुळे कोरोना लॉक डाऊन काळात जीव जोखमीत टाकून सर्वांचे रक्षण करणाऱ्या कोरोना योद्धयांना मदत करत वाढदिवस करण्याचे त्यांनी ठरवले. पोलीस कर्मचारी, आरोग्यसेवक, डॉक्टर्स, नर्सेस, मीडिया पर्सन्स यांना सॅनिटायझर, मास्क, फेस शिल्ड व इतर साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये सरकारी कोविड रुग्णालय कासा, टिमा हॉस्पिटल, एकलव्य बेटेगाव कोविड सेंटर, कासा पोलीस स्टेशन याठिकाणी सॅनिटायझर, मास्क, फेस शिल्ड व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे फक्त माणसांचेच नाही तर मुक्या प्राण्यांना देखील उपासमारी सारख्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. कोरोनामुळे भटक्या कुत्र्यांची होणारी उपासमार लक्षात घेता पालघरमध्ये भटक्या कुत्र्यांना मायेचे दोन घास देण्याचे पुण्याचं काम त्यांच्याद्वारे केलं जात आहे. यामुळे त्यांच्यातील संवेदनशीलता व माणूसकी सर्वांसमोर येतेय हे मात्र नक्की. कल्पेश धोडी यांचे हे कार्य तरुणांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणारे आणि समाजाप्रती असणाऱ्या आपल्या उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारे आहे. मुंबई ई न्यूज नेटवर्कच्या संपूर्ण टीमकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here