पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरातील सतिपाडा येथील एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते आहे. पॉझिटिव्ह आलेला तरुण त्याच्या मामाला उपचारासाठी केईएम रुग्णालयात घेऊन गेला होता. आठ दिवसांनी परत आल्यानंतर त्याला व इतर ४ जणांना आशागड येथील संतोषी येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईन करण्यात आलेल्या पाचही जणांचे स्वॅबचे सॅम्पल हे कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या ५ जणांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित लोकांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती मिळते आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हा आज एकाच दिवसातील तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. डहाणूतील या नव्या रुग्णासह पालघर ग्रामीण मधील रुग्णांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे. आज दुपारीच मुंबई येथे कार्यरत कोरोना पॉझिटिव्ह परिचारिकेच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here