विरारमध्ये महिला Api च्या कारवर अनोळखी इसमांची फायरिंग

0
446

पालघर-योगेश चांदेकर:

पालघर-जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला विरार मध्ये पालघर स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिटच्या प्रभारी Api सिद्धवा जायभाये यांच्या कारवार अज्ञात इसमानी 2 गोळ्या फायर करून फरार झाले आहेत. यात जायभाये ह्या थोडक्यात सुदैवाने बाचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत नॉवेल्टी हॉटेलच्या बाजूला शनिवारी साडे आठ च्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत अज्ञात आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये या पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या प्रभारी आहेत. नालासोपारा कार्यालयातून त्या शनिवारी रात्री आठ च्या सुमारास आपल्या सहकार्या सह त्यांच्या खाजगी स्वीप्ट कार मधून पालघर ला घरी जात होत्या. साडे आठ च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत नॉवेल्टी हॉटेलच्या बाजूला बर्गर घेण्यासाठी थांबल्या होत्या. त्याचवेळेस काळ्या रंगांच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमानी त्यांच्या दिशेने 2 गोळ्या फायरिंग करून फरार झाले आहेत. फायरिंग केलेल्या गोळ्या ह्या त्यांच्या कारच्या बोनेट वर लागल्याने त्यांचा जीव वाचला आहे. यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी त्याची कार ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्यावर फायरिंग होताच तात्काळ वसई तालूक्यातील पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते. ज्या कारवर फायरिंग झाली ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत अज्ञात आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here