MUMBAI e NEWS [मुंबई]:
मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर आहे. लहान मुलांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कोणत्याही स्थितीत वाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही असा आक्रमक पावित्रा घेतला आहे. महापालिकेकडुन येणे असलेली एकूण 135 कोटी रुपये अनुदानाची रक्कम थकीत असल्याने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. रुग्णालय कर्मचारी आज पासून तीन दिवस धरणे आंदोलन करणार असून या आंदोलनात सहभागी होत शर्मीला ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला.

तातडीने बैठक बोलावून तोडगा काढा – शर्मिला ठाकरे
रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत शर्मिला ठाकरे यांनी आपला पाठिंबा दर्शविला. “वाडिया हॉस्पिटल बंद झाल्यास गरीब, गरजू रुग्णांनी जायचे कुठे? मंत्री तसेच महापालिकेने तातडीन बैठक बोलवावी आणि या प्रश्नावर तोडगा काढावा. काहीही झाले तरी हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही” असे मत शर्मिला ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं – सचिन सावंत
मुंबईतील लाखो लोकांना जिवदान देणारे हे रुग्णालय सुरु राहणे गरजेच आहे. या स्थितीला कोण जबाबदार हे शोधण्यापेक्षा लवकरात लवकर निर्णय घेऊन हॉस्पिटल सुरु ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here