पालघर-योगेश चांदेकर :

पालघर-राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा 2003 (कोटपा) च्या अंमलबजावणी करण्यासाठी आज दि 15 फेब्रुवारी 2020 रोजी पूजा कट्टी (सामाजिक कार्यकर्त्या) यांची विजयकांत सागर (अपर पोलिस अधीक्षक, वसई) यांच्याशी चर्चा झाली.

डिसेंबर 2018 मध्ये शाळा, शासकीय कार्यालये, रुग्णालये परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रिचे स्टॉल हटविण्यासाठीचे प्रयत्न त्याचा मागोवा यावर बोलताना सागर व टीम यांनी खूप मेहनत घेतली यासाठी महानगरपालिका, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांची व्यवस्थित सांगड घालून परत अशा प्रकारची मोहीम लवकरच हाती घेऊ असं मत व्यक्त केले. 67 अवैध्य स्टॉलवर 2018 मध्ये कारवाई करण्यात आली. कायद्यातील त्रुटींमुळे देखील आमचे हात बांधले गेले असल्याची खंत व्यक्त करताना दंडाच्या पलीकडे जाऊन आम्ही काही कारवाई करण्यात हतबल आहोत कारण शॉप एक्ट लायसन्स नुसार आम्ही त्यावर कारवाई करु शकत नाही.

पूजा कट्टी यांनी पोलिसांनी करत असलेल्या कारवाई बाबत निराशा व्यक्त केली, तुळींज विभागातील जिल्हा परिषद शाळा येथील परिसरातील अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीच्या अड्ड्यांवर कायमस्वरुपी तोडगा निघावा यासाठी विजयकांत सागर यांनी जातीने लक्ष द्यावे यासाठी विनवणी केली. पोलिसी कारवाईत सातत्य नसल्याने अशा विक्रेत्यांचे फावले जात आहे, तसेच याबाबत शिक्षकांची, पालकांची देखील तेव्हढीच जबाबदारी आहे. सामाजिक संस्था, संघटना यांची योग्य ती साथ तूम्हाला मिळेल असे आश्वासन पूजा कट्टी यांनी दिले. मार्च अखेरपर्यंत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण सप्ताह सुरू करू असे आश्वासन विजयकांत सागर यांनी दिले.

शाळा परिसरातील १००यार्ड त्रिज्येतील तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रिचे स्टॉल कायमस्वरूपी हटवावेत.

पूजा कट्टी (सामाजिक कार्यकर्ती)

वविमनपा, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांची सांगड घालून लवकरच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करू.

विजयकांत सागर (अपर पोलिस अधीक्षक, वसई)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here