पालघर-योगेश चांदेकर

बोईसरचा आदित्य ठरला शाळेत अव्वल

पालघर-गेल्या तीन-चार वर्षांपासून कमरेखालील स्नायूवर शरीराचे नियंत्रण नसलेल्या बोईसर येथील आदित्य विकास संदानशिव या विद्यार्थ्याने बोईसर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. स. दा. वर्तक शाळेत शाळांत परीक्षेत (एसएससी) अव्वल क्रमांक पटकावला आहे. आपल्या अपंगत्वावर मात करून जिद्दीच्या बळावर पुढे उच्चशिक्षित होऊन शासकीय सेवेत नोकरी करण्याच्या निर्धार या विद्यार्थ्याने व्यक्त केला आहे.

मूळच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरात जन्मलेल्या आदित्यचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील विठ्ठलवाडी येथे झाले आहे. त्याचे वडील विकास संदानशिव हे बोईसरमधील सेवा आश्रम विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक असून आदित्यला लहानपणापासून पायाच्या टाचा टेकण्याबाबत समस्या होती. सातवी इयत्तेत आल्यानंतर त्याच्या कमरेखालील स्नायूंवरील शरीराचे नियंत्रण कमी होत गेले. त्याच्यावर सांगली, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी औषधोपचार करण्यात आले. मात्र आदित्यला जडलेल्या या दुर्मिळ आजारावर औषधे उपलब्ध नसल्याने मुंबईजवळ आल्यास उपचाराची नवीन संधी प्राप्त होईल या आशेवर त्याच्या वडिलांनी बोईसर येथील शाळेत आपली बदली करून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here