पालघर-योगेश चांदेकर

पालघर- राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंती निमित तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालघर जिल्हा परिषदे मार्फत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना अर्पण करण्यात आली. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातन्त्र्य चळवळीत व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो .

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असणाऱ्या व देशाला अणुशक्ती बनवण्याचा संकल्प करणाऱ्या इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातो.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी महेन्द्र वारभुवन, प्रकल्प संचालक माणिक दिवे, सामान्य प्रशासन विभागाचे स.प्र.अ. सतीश मांडवेकर इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here