पालघर जिल्ह्यातुन तीन हजार निवृत्तांची धडक

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-भगतसिंग कोशियारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर या आपल्या दोन प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयांवर ईपीएस्-९५ समन्वय समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील तिन हजार निवृत्तांनी जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांचे नेतृत्वाखाली यात सहभाग घेतला. कोशियारी समिती लागू करा, किमान ९००० पेन्शन मिळालेच पाहीजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करुन ३१ मे २०१७ चे परिपत्रक रद्द करा आदि घोषणांनी परिसर दणदणला होता. आयुक्तांना या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळामार्फत देण्यात आले.

केंद्र सरकारने वरिल दोन प्रमुख मागण्यांबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास येत्या पाच डिसेंबरला दिल्लीत आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. सरचिटणिस प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष अशोक राऊत, खजिनदार रविंन्द्र कदम, ज्येष्ठ नेते रविंन्द्र चाफेकर, हेमंत पाटील ,बाळा पेडणेकर, जयप्रकाश झवेर ,सदानंद ढगे, कोचरेकर आदिंनी या निदर्शनांचे नेतृत्व केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here