पालघर-योगेश चांदेकर

कुडूस- तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी सापरोंडे-मांगाठणे या ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक आज (ता. 1)रोजी ग्रामपंचायतीचे सरपंच सुषमा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन यावेळी जान्हवी पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जान्हवी जितेश पाटील या गेल्या दहा वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असुन त्यांच्या या निवडीने ग्रामस्थांमध्ये आनंददायी वातावरण आहे.
या सापरोंडे-मांगाठणे ग्रामपंचायतीला दोन वेळा तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळाले आहेत. तर या ग्रामपंचायती मध्ये बिनविरोध सदस्य निवडीचीही परंपरा गेल्या अनेक वर्षां पासुन आजवर सुरु आहे.
जान्हवी पाटील यांच्या या निवडीने त्यांच्या वर अभिनंदनाचावर्षाव सुरु आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रविंद्र राठोड यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here