कोविड-१९ वरील लसीची चाचणी करण्यात आलेल्या महिला शास्त्रज्ञाचा मृत्यू हि अफवाच!

0
352

लंडन:
संपूर्ण जगात सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसचा सर्वाधिक फटका युरोप आणि अमेरिकेला बसला आहे. जगातील अनेक देशातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवरील लस शोधण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.कोविड-१९ वरील लसीची चाचणी करण्यात आलेल्या महिला शास्त्रज्ञाचा मृत्यू हि अफवाच आहे. एलिसा ग्रॅनाटो हि महिला मायक्रोबायोलॉजिस्ट या चाचणीसाठी पुढे आली होती.

एलिसा ग्रॅनाटो यांच्यासंदर्भात संशोधकांनी एक निवेदनही दिले आहे. यात, लस घेतल्यानंतर काही तासांनी एलिसा यांच्या शरिरातील गुंतागुंत वाढली आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली असताना कोरोनावरील प्रायोगिक लस घेणाची हिम्मद दाखवणाऱ्या एलिसा, या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. ज्या दोन जणांना सर्वप्रथम ही लस टोचण्यात आली. त्यापैकी एलिसा एक आहेत. आणखी चार स्वयंसेवकही या लसीच्या रिअॅक्शनशी फाईट करत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष असल्याचे अधिकाऱ्यांनी सागितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here