मुंबई-योगेश चांदेकर
मुंबई – मिरारोड येथे राहणा-या ७ महिन्याच्या बाळाने खेळता खेळता बाटलीचे झाकण गिळंकृत केले. दिड इंचाचे हे झाकण घशात अडकल्याने आवाजही फुटत नव्हता, त्याला श्वास घेण्यात अडचण येऊ लागली आणि त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याच्या पालकांनी त्वरीत मिरारोड येथील वोक्खार्ट हॉस्पीटलकडे धाव घेतली. डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी हे बाटलीचे झाकण बाहेर काढले आणि बाळाचा जीव वाचविला.

मीरा रोड वोक्खार्ट हॉस्पिटलच्या ईएनटी सर्जन डॉ नीपा वेलिमुत्तम म्हणाल्या, पालकांना जसे समजले की बाळाला श्वास घेण्यास तसेच काही गिळण्यास त्रास होतो त्यावेळी त्यांनी त्वरीत रूग्णालयात धाव घेतली. आमच्याकडे बाळाला त्वरीत आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले तसेच काही तपासणी करण्यात आल्या त्यावेळी सिटीस्कँन तपासणीत बाळाच्या घशामध्ये बाटलीचे झाकण अडकल्याचे दिसून आले. डॉ अंकीत गुप्ता यांनी बाळाला त्वरीत ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. बाळावर ब्रोन्कोस्पोकी करण्यात आली. या अचानक झालेल्या अपघातामुळे बाळाची प्रकृती चिंताजनक झाली होती आणि यामध्ये बाळ दगावण्याची शक्यता होती. अशावेळी डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून त्वरीत शस्त्रक्रीया केली. अवघ्या ५ मिनीटातच घशात अडकलेले झाकण बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. या दरम्यान बाळाला भूल देण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर दुस-याच दिवशी बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर बाळाने सर्वासामान्य आहार घेण्यासही सुरुवात केली.
जेव्हा हा अपघात झाला त्यानंतर “बाळाचा जीव गुदमरत होता आणि बाळ सतत रडत होते. सुदैवाने, बाळाला मिरारोड येथील वोक्खार्ट हॉस्पीटलमध्ये त्वरित उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. आमच्या बाळाला पुन्हा मुक्तपणे श्वास घेण्यास मदत केल्याबद्दल आम्ही वोक्खार्ट मिरारोड हॉस्पीटल व तेथील डॉक्टरांचे आभार मानतो. आमच्या बाळाला आता वेदनामुक्त झाल्याचे पाहून आम्हाला आनंद झाल्याची प्रतिक्रीया बाळाचे वडील रमण कुमार यांनी व्यक्त केली.