पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सारणी याठिकाणी दोन पीपीई किट्स रस्त्यावर टाकल्याचे आढळले असल्याने परिसरात एकचं खळबळ माजली होती. सामाजिक कार्यकर्ते निवास वरठा हे गंजाड येथून चारोटीकडे जात असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आलेले दोन पीपीई किट्स दिसले होते. त्यांनी संबंधित घटनेबाबत मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांना संपर्क साधत त्यांच्या हि गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने त्याचे निर्जंतुकीकरण करून विल्हेवाट लावण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुंबई ई न्यूजने याघटनेची बातमी प्रसिद्ध करताच डहाणू पंचायत समिती उपसभापती पिंटु गहला यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. उपसभापती पिंटु गहला आणि तालूका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र ऐना येथील डॉ. केतन सुरवसे व वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद झंझाड, प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाडचे डॉ. प्रसाद मुकने, सामाजिक कार्यकर्ते निवास वरठा व आरोग्य कर्मचारी यांनी PPE किटचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले. निर्जंतुकीकरण केल्यानंतर सदर किट येलो बॅगद्वारे ते प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाडचे डॉ. प्रसाद मुकने यांच्याकडे विल्हेवाट लावण्यासाठी सोपवण्यात आले. त्यांनी ते बायोमेडिकल वेस्टमध्ये जमा केलं आहे अशी माहिती दिली आहे.

“आपल्या डहाणू तालुक्यात अशा कुठल्याही घटना घडत असतील तर त्याबाबत त्वरीत पोलीस स्टेशनला किंवा दवाखान्यात संपर्क करावा, जो कोणी असे वैद्यकीय साहित्य उघड्यावर टाकत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी देखील अशा बेवारस वस्तुंना स्पर्श न करता प्रशासनाला संपर्क साधावा” – पिंटु गहला, डहाणू पंचायत समिती उपसभापती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here