पालघर: योगेश चांदेकर

करोनाच्या पार्श्वभूमीवर विस्कटलेले आर्थिक गणित सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूक सेवा सुरू केली आहे. रा. प. पालघर आगारातून माल वाहतुकीस सुरुवात सुंदरम कंपनीने पालघर येथे केली आहे. याचे उद्घाटन पालघर विभाग नियंत्रण अजित गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले होते. या सेवेला महिनाभरातच पालघर जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योग ‘कारखानदारांची मागणी वाढल्याने नवीन १० मालवाहतूक गाड्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती एस. टी. महामंडळाने दिली आहे. कारखानदारांच्या मधून चांगला प्रतिसाद मिळत असून मालवाहतुकीला वाढत्या मागणीनुसार वाहने कमी पडू लागली आहेत. विभाग नियंत्रक, पालघर ‘व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागल्यामुळे आता नव्याने माल वाहतुक गाड्या तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. या सेवेला पालघर एमआयडीसी, बोईसर एमआयडीसी, शेतकरी चांगली पसंती दिली आहे. त्यामुळे माल वाहतूक सेवा महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी योग्य पद्धतीने दिली जात आहे. यामध्ये महामंडळ बी-बियाणे विभाग यासह आता माल वाहतूक सेवा महाराष्ट्र स्थितीत विदर्भ, वर्धा, नंदुरबार, पेण, इतर विभागातील कारखानदार यांनी राज्यातील विविध ठिकाणी योग्य पद्धतीने दिली जात आहे.

यावेळी यंत्र अभियंता बेहेरे मॅडम, विभागीय वाहतुक अधिकारी आशिष चौधरी, विभागीय भांडार अधिकारी अमोल वाघ, आगार व्यवस्थापक पालघर नितिन चव्हाण व आगारातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

मालवाहतूक सेवेला प्रत्येक विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारखानदारांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्याही वाढवत आहोत. तसेच यामुळे एसटीला या मार्गातून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. – अजित गायकवाड (एसटी विभाग नियंत्रक पालघर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here