पालघर Impact: सॅनिटायझर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश..!

0
383

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्‍यातील कासा ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना वाटण्यासाठी मागविणेत आलेल्या ५० रुपये किंमत असणाऱ्या हँड सॅनिटायझर बॉटलवर चक्क १९० रुपये चे स्टिकर लावण्यात आले असल्याचा एक्सक्लुजीव व्हिडीओ मुंबई ई न्यूजने प्रसारित केला होता. याबाबत चौकशी करण्याची मागणी २ जून रोजीच्या जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये सन्माननीय सदस्यांनी केली होती. याप्रकरणी महेंद्र वारभुवन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर प्रकरणाची चौकशी पारदर्शकपणे व्हावी यासाठी पंचायत समिती तलासरीचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. सदर सॅनिटायझर खरेदीबाबत दरसूचीप्रमाणे खरेदी झाली आहे अगर कसे? तसेच खरेदीबाबतचे इतर निकष पाळले आहेत किंवा नाही? याबाबत सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

डहाणू तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी देखील संबंधित पुरवठादाराकडून अथवा कंपन्यांकडून सॅनेटायझर खरेदी केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच सॅनेटायझर खरेदी प्रकरणांची चौकशी व्हायला हवी तरच झालेला गैरप्रकार बाहेर पडेल. त्यामुळे चौकशी अधिकारी काय अहवाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here