जिल्ह्यात प्रथमच फिरत्या दवाखान्याद्वारे होणार मोफत उपचार; पालकमंत्र्यांकडून शुभारंभ!

0
418

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात भीतीच वातावरण आहे. तसेच लॉक डाऊनमुळे इतर आजार असणाऱ्या लोकांना दवाखान्यात जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. नागरिकांची हि अडचण ओळखत दि. पालघर होलसेल मर्चंट असोशिएशन (व्यापारी संघटना) पालघर यांनी इंडियन मेडिकल असोशिएशन आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर नगरपरिषद क्षेत्रात फिरता दवाखाना सुरु केला आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. या फिरत्या दवाखान्याद्वारे डॉक्टर व नर्स पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विविध भागात जाऊन लोकांना सर्व नियमांचे पालन करत मोफत आरोग्यसुविधा देणार आहेत.

पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विविध भागात जाऊन लोकांना स्पीकरद्वारे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत तपासणीसाठी गाडीजवळ येण्याचं आवाहन करत मोफत आरोग्यसुविधा देणार आहेत. फिरत्या दवाखान्याद्वारे रुग्णांचे मोफत थर्मल स्कॅनिंग होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. फक्त आरोग्य तपासणीच नाही तर प्राथमिक औषधोपचार देखील मोफत देण्यात येणार आहे. त्यापुढील उपचाराची गरज असल्यास संबंधित रुग्णास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम असून नागरिकांकडून या उपक्रमाचं कौतुक होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पालघर तहसीलदार सुनील शिंदे, प्रांत विकास गजरे, तालूका आरोग्य अधिकारी अभिजीत खंदारे, नगराध्यक्षा उज्वला काळे, संघटनेचे अध्यक्ष पुनमचंद जैन, कार्याध्यक्ष भगवानलालजी जैन, कोषाध्यक्ष धर्मेश जैन, संघटन मंत्री शांतीलाल, उपाध्यक्ष रमेश जैन, उपाध्यक्ष हिरनभाई जैन, कांता हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत या फिरता दवाखाना उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here