पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना वायरस बाबतीत समाज माध्यमांवर अधिकृत किंवा अनधिकृत माहितीचा पूर आला असताना ग्रामीण भागातील बरेच लोक अजूनही समाज माध्यमांपासून लांबच आहे आणि सोशल मिडियातील माहीतीवर विश्वास ठेवण्यापेक्षा जागतिक आरोग्य संघटने कडून दिली गेलेली आधिकृत माहिती आपल्या भागातील प्रवाशांपर्यंत पोहचावी म्हणून डहाणू ते वैतरणा मधिल प्रत्येक स्थानकावर माहितीचे फलक लावण्याचा निर्णय डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या कार्यकारिणीने घेतला आणि जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेले कोरोना वायरस संदर्भातील ५ वेगवेगळे फलक एकत्र करुन त्याचे योग्य प्रकारे मराठीत भाषांतर करुन त्याचा एक रेखिव फलक बनवण्यात आला.

डहाणू ते वैतरणा मधिल प्रत्येक स्थानकावर पुढिल १ महिन्यासाठी दोन फलक लावण्याची रेल्वे प्रशासनाकडून रितसर परवानगी मिळवण्यात आली. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांनी डहाणू ते वैतरणा स्थानकावरील प्रत्येक स्थानक अधिक्षकांना व रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना व्यक्तीशः भेटून फलकाची माहिती देऊन त्यांच्या मदतीने सर्व स्थानकांवर फलक लावले तसेच त्यांना वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती करण्याची विनंती केली.

कोरोना विषाणू संदर्भातील माहिती देणारी उद्घोषणा जास्तीत जास्त वेळा मराठी भाषेत करण्याची विनंतीही संस्थेच्या वतीने सर्व स्थानक अधिक्षकांना करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here