पालघर: ‘त्या’ कोरोनाग्रस्त नर्सच्या अतिजोखमीच्या संपर्कातील ५ जण क्वारंटाईन!

0
468

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई येथे आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या पालघरमधील एका परिचारिकेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्या कुटुंबातील हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या ५ जणांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाग्रस्त परिचारिका मुंबई येथे कार्यरत असताना तिची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

पालघर येथे वास्तव्यास असणारी ती परिचारिका रोज कामाच्या ठिकाणी प्रवास करत होती. त्या परिचारिकेवर सध्या मुंबईत उपचार सुरु असून अतिजोखमीच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबियांना क्वारंटाईन केले जाणार आहे. या ५ जणांमध्ये त्या परिचारिकेचा पती, आईवडील आणि भाऊ यांचाही समावेश आहे. तिच्या प्रवास इतिहास तपासून तिच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची माहिती घेणे सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here