पालघर: डहाणू भाजप कार्यालयात गर्दी; सोशल डिस्टेंसिंगचे सर्व नियम धाब्यावर..!

0
352

पालघर – योगेश चांदेकर:

डहाणू भाजप कार्यालयातच सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन न करता या ठिकाणी जमाव एकत्र येत आहे अशी माहिती या परिसरात राहणाऱ्या लोकांनी केली होती. असे असताना प्रशानाकडूनही याकडे डाेळे झाक हाेताना दिसते आहे अशा भावना भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. सामान्यांवर १४४ व १८८ कलम अंतर्गत कारवाई होते तर मग भाजप पक्ष कार्यालयात एवढी गर्दी करणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांवर कार्यवाही होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कायदा सर्वांना समान आहे याचा कदाचित भाजप कार्यकर्ते व नेत्यांना विसर पडला आहे का? अशा भावना भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

पालघर जिल्हा रेडझोनमध्ये असताना अजूनही नागरिकांकडून पुरेशी खबरदारी घ्यावी यासाठी प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत असताना हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने कोरोनाचं संकट जास्त गडद होत असताना कार्यकर्ते व नेत्यांनी जास्त जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. दरम्यान हि गर्दी कोणत्या कारणासाठी झाली आहे ते समजले नाही. याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी भागातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here