महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या प्रमुख सल्लागार पदी कुंदन संखे यांची निवड

0
418

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे अध्यक्ष , शिवसेना उपनेते,खासदार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पालघर विभागाच्या प्रमुख सल्लागार पदी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांची निवड केली आहे.

कुंदन संखे हे पूर्वी मनसेचे जिल्हाप्रमुख होते तर जिल्ह्यात एक आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु अचानक त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता मेळावे, प्रवेश व बैठका सुद्धा घेतल्या होत्या. मात्र कुंदन संखे यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले होते. जिह्यात दांडगा जनसंपर्क असलेले व आंदोलनातील नेता अशी त्यांची ओळख आहे तर प्रशासनातही त्यांची एक वेगळीच पकड आहे.

दरम्यान कुंदन संखे यांचे संघटनकौशल्य दांडगे असून निर्धार या त्यांच्या संघटनेच्या मध्यमातूनही जिह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कुठल्याही प्रश्नात तात्काळ, अभ्यासू व आक्रमकपणे सामोरे जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून शिवसेना त्यांना जिल्ह्यात पक्षीय कुठली जवाबदारी देते, हेही बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here