तलासरीत २ कंटेनरमधून ११० लोकांना घेतले ताब्यात

0
503
संग्रहित
संग्रहित

पालघर – योगेश चांदेकर
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्य सेवा देणाऱ्या वाहनांना मुभा देण्यात आली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत २ कंटेनरमध्ये बांद्रा, ठाणे, गोरेगाव व कर्नाटक या ठिकाणचे रहिवासी असणाऱ्या ११० लोक असल्याचा प्रकार पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील अच्छाड येथे उघड झाला आहे. सदर कंटेनर संशयास्पद वाटल्याने त्याची तपासणी केली असता दोन कंटेनरमध्ये ११० लोक असल्याचे आढळले.

तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली API जाधव आणि PSI गावडे यांनी हि कारवाई केली आहे. सदर कंटेनर मधील ११० लोकांची तलासरी येथील ठक्करबाप्पा कॅम्पस मध्ये सोय करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तलासरी येथे दुधाच्या टँकरमधुन कामगारांना गावी घेवुन जात असल्याचा प्रकार उघड झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here