पालघर: ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

0
412

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर ग्रामीण रुग्णालय येथील 30 वर्षीय पुरुष कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. तसेच हा कोरोनाबाधित कर्मचारी पालघर मधील लक्ष्मी लॉज, माहीम रोड, पालघर येथे वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर रुग्णाची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने परिसर सील करण्यात येत आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here