उमरोळी येथे वंजारी समाजाच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा संपन्न

0
365

पालघर – अरुण पाटील

उमरोळी येथील साई ग्राम विकास मंडळ मैदानार 2 दिवसाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दापोली क्रिकेट क्लबचे दीपेश पाटील, भावेश पाटील व सदस्य यांनी आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत 16 संघाने सहभाग घेतला होता.

या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुंबई ई न्यूजचे पालघर ब्युरो चीफ योगेश चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना फेककॉल द्वारे होत असलेल्या फसवणुकीबद्दल चिंचणी पाटीलपाडा शाळेचे शिक्षक अंकलेश्वर पाटील यांनी माहिती दिली. बँकेच्या संबंधित कोणतीही गोपनीय माहिती इतर कुणाशीही शेअर करू नये असं मार्गदर्शन त्यांनी केलं.

चीनमध्ये हाहाकार माजलेल्या कोरोना व्हायरस बद्दल खबरदारीची उपाययोजना याबद्दल दापोली क्रिकेट क्लबचे दीपेश पाटील आणि भावेश पाटील यांनी उपस्थितांना अवगत केले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना माजी जिल्ह्य प्रमुख उत्तम पिंपळे, मुंबई ई न्यूजचे पालघर ब्युरो चीफ योगेश चांदेकर, दापोली उपसरपंच हेमंत संखे, भाजपचे शीरिष संखे, मनोर ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, चिंचणी पाटीलपाड़ा शाळेचे शिक्षक अंकलेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचीन पाटील, मोरेकुरण ग्रामपंचायत सदस्य अजित संखे, दापोली ग्रामस्थ मनोज संखे, निर्धार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुंदन संखे, रोशन संखे, मंगेश पाटील, वसंत संखे, मंगेश संखे यांसह मंडळाचे सदस्य, उपस्थित होते.

या स्पर्धेत कुंभवली गावदेवी संघ प्रथम विजेता तर परनाळी संघ यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले सदर संघाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेसह आकर्षक चषक देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here