पालघर: काही समाज कंटकांकडून पोलीसांवरच दगड फेक; गाड्यांचे नुकसान,पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

0
368

पालघर – योगेश चांदेकर

डहाणू तालुक्यातील सारणी व आजुबाजूच्या गावात काही दिवसांपासून चोरटे फिरत असल्याच्या अफवेमुळे एकूणच भयभीत वातावरण झाले आहे. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता डॉ. विश्वास वळवी हे गरजू लोकांना धान्य वाटप करून माघारी येत असताना सारणी पाटील पाडा येथे त्यांची गाडी अडवण्यात आली. चोर आल्याचे समजून त्यांची गाडी अडवून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यावेळी त्यांनी कासा पोलीस स्टेशन यांची मदत मागवली. मात्र काही समाज कंटकांनी पोलीस गाडी येताच दगडफेक करत पुढे येण्यास मज्जाव केला.

कासा प्रभारी पोलिस अधिकारी आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे व कर्मचारी जगताप, गवळी व सह कर्मचारी यांच्यावर दगड फेक करत त्यांना माघारी परतण्यास सांगितले. पोलीस हवालदार जगताप यांना जबर मार लागल्याने त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. समाज कंटकांनी केलेल्या दगडफेकीत दोन अधिकारी व दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटनेचा योग्य तपास करून दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे कासा प्रभारी पोलिस अधिकारी आनंदराव काळे यांनी संगितले.

या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र घरापासून लांब राहून सेवा बजावणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करत काही समाज कंटकांनी आपले लक्ष्य केल्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here