पालघर: हजारो खलाशांना डहाणूत आणण्यात यश; गुजरातमध्ये अडकलेले सर्वजण परत येईपर्यंत पाठपुरावा करणार – खा. गावित

0
413

पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील हजारो मच्छीमार-खलाशी पोरबंदर, वेरावळ, सौराष्ट्र व मंगरूळ या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यापैकी काल दोन बोटींद्वारे डहाणू येथे गुजरात येथे अडकलेले ३०६ जणांना आणण्यात आले होते. आज पुन्हा ८ बोटींद्वारे जवळपास १००० जणांना डहाणू येथे आणण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

अद्याप ३ ते ४ हजार मच्छीमार-खलाशी गुजरातच्या पोरबंदर, वेरावळ, सौराष्ट्र याठिकाणी अडकून आहेत. त्याठिकाणी अडकून असलेल्या मच्छीमार-खलाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत गुजरातमधील संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून लवकरात लवकर अडकलेल्या सर्व मच्छीमार-खलाशांना पालघरमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार गावित यांनी सांगितले.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, तलासरी पंचायत समिती सभापती नंदू हाडळ, नगराध्यक्ष भरत राजपूत, उपजिल्हा प्रमुख डहाणू विधानसभा संतोष शेट्टी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पोलीस अधिकारी-कर्मचारी, यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

  • “महाराष्ट्र प्रशासन व गुजरात मधील संबंधित प्रशासनाचे योग्य ते सहकार्य मिळत आहे. प्रशासनाच्या मदतीने लवकरच गुजरातमध्ये अडकलेल्या मच्छीमार-खलाशांना सुरक्षितपणे पालघरमध्ये आणण्यात येईल. गुजरातमध्ये अडकलेले सर्व मच्छीमार-खलाशी परत येईपर्यंत पाठपुरावा करणार.” – खासदार राजेंद गावित

  • “शेकडो मच्छीमार परत आले असले तरी आणखी हजारो लोक गुजरात मधील विविध भागात अडकलेले आहेत. त्या सर्वांना लवकर परत आणण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.” – नंदू हाडळ(सभापती – तलासरी पंचायत समिती)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here