पालघर: शेतकऱ्यांचा युरिया कंपन्यांच्या घशात; प्रशासनाचा कानाला खडा..!

0
431

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यात सबसिडी यूरिया येत असून गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना याचा जरासा देखील संशय न येऊ देता थेट कंपन्यांना विकला जातो. शासन शेतकऱ्यांना शेतीच्या वापरासाठी अनुदानित युरिया कृषी केंद्रांना पुरवते, कृषी केंद्रे सदर युरिया फक्त कागदावरच वितरित करतात. यांतील मोठ्या प्रमाणात युरिया थेट कंपन्यांना पुरवला जात आहे अशी चर्चा सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये ऐकण्यास मिळत आहे. युरियाच्या अफरातफरीसाठी एक मोठी लॉबी सक्रिय असून जिल्ह्यातील अनेक बड्या प्रस्थांचा यामध्ये समावेश आहे असेही ऐकावयास मिळत आहे.

दरम्यान पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सबसिडी यूरियाचा मोठा काळाबाजार होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर मुंबई ई न्यूजने याची बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसारित झाल्यानंतर हा युरिया माफिया कोण? याची चर्चा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींसोबतच त्यांच्या चमच्यांचा देखील सहभाग असल्याचे शेतकऱ्यांच्या चर्चेतून ऐकण्यास मिळत आहे. आता हा लोकप्रतिनिधी कोण आणि त्याचे चमचे कोण याचा शोध घेऊन कृषी विभागाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु पालघर जिल्ह्यातील कृषी विभाग सध्यातरी या प्रकरणात शांतच असून या शांततेमागचं गौडबंगाल काय? हा प्रश्न देखील शेतकरी वर्गात चर्चिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here