पालघर: विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथे पकडला २५००किलो रेशनिंगचा तांदूळ!

0
496

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथे रेशनिंग धान्याने भरलेला पिकअप सरपंच मंजू कोम व ग्रामस्थांनी सकाळी 9.25 च्या सुमारास पकडला आहे. सदर पिकअप मध्ये 25 किलोच्या 100 गोण्या आहेत. पकडलेला सदर माल रेशनिंगचाच असल्याची माहिती पुरवठा अधिकारी पुंडलिक पाटील यांनी दिली आहे.

कोंडगाव येथील ताराचंद दोशी हा तांदळाचा व्यापारी असून त्याच्या घरामध्ये हा माल उतरविला जात होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो धान्याचा काळाबाजार करत असल्याची ग्रामस्थांना शंका होती. आज ग्रामस्थांसह सरपंचांनी स्वतः हा माल पकडला व याबाबत विक्रमगड तहसीलदारांना माहिती दिली. विक्रमगड तहसीलदार यांनी तात्काळ विक्रमगड तालुका पुरवठा अधिकारी पुंडलिक पाटील यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून हा माल रेशनिंगचाच असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान हा माल कुठून आणण्यात आला होता हे समजू शकले नाही. हा सर्व माल पिकअप द्वारे विक्रमगड पोलीस स्टेशन येथे नेण्यात येणार आहे. तसेच धान्याचा काळाबाजार केल्याचा गुन्हा विक्रमगड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here