पालघर: सफाळे, काटाळे, उसरणी भागातील त्या ३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

0
449

पालघर – योगेश चांदेकर:

वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या ३ वर्षीय मुलीच्या व सफाळे भागातील इतर ३ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पालघर तालुक्यातील सफाळे, काटाळे, उसरणी या भागातील आशा वर्कर, नर्स व डॉक्टरसह ३० यांचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. पालघर तालुक्यातील सफाळे, काटाळे, उसरणी या भागातील ३० ते ३५ जण कोरोनाबाधित मुलीच्या व इतर ३ रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्यापैकी ३० जणांचे तपासणी अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त प्राप्त झाले असून अद्याप काही अहवाल प्रतीक्षेत आहेत अशी माहिती आरोग्य विभाग पालघर यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान गंजाड येथील ३ वर्षीय मुलीच्या तसेच सफाळे भागातील इतर ३ रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांचे विलगीकरण करून स्वॅब सॅम्पल कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. त्या ३ वर्षीय मुलीच्या व सफाळे भागातील इतर ३ रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांपैकी पालघर तालुक्यातील १६ तारखेला पाठवलेल्या सर्व स्वॅब सॅम्पल चे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. अद्याप पालघर तालुक्यातील १० जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here