एस .टी .कामगार व प्रवाशांच्या ‘या’ प्रश्नांकरता शिवसेना आक्रमक

0
451

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-पालघर जिल्हयातील एकूणच असलेली एस टी ची अवस्था, प्रवाश्यांच्या अनुरूप न केलेले नियोजन त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक व प्रवाशांना गैर सोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच वर्षानुवर्ष एस टी च्या माध्यमातून सेवा देणारे चालक ,वाहक, यांत्रिकी कामगार यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकरीता शिवसेनेच्या महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने जिल्ह्याचे प्रमुख सल्लागार कुंदन संखे व जिल्हा विभागीय पदाधिकारी यांच्या उपस्थीतीत जिल्ह्यातील सर्व संबंधीत एस .टी. आगारातील आगार प्रमुख यांच्याकडे तीन दीवसाचा विभागीय दौरा आयोजीत करण्यात आला होता. सदर दौऱ्यात आगार प्रमुखांकडे प्रवाशांबाबत निवारा शेड नसणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची असलेली दुरावस्था, अनियमीत बस व्यवस्थेमुळे प्रवाशांना होणारा त्रास याबाबत जाब विचारण्यात आला, तसेच कामगारांच्या बाबतीत प्रशासनाची असलेली वागणूक, त्यांना कामाचे वाटप होत असताना जाणीवपूर्वक केली जाणारी अनियमितता, काही आगारप्रमुखांची असलेली अरेरावी याचाही जाब विचारण्यात आला.

सदरचा दौरा संपल्यानंतर कुंदन संखे व जिल्हा शिष्टमंडळाने जिल्ह्याचे विभाग नियंत्रक अजित गायकवाड यांची भेट घेऊन जिह्यातील एस टी प्रवाशांच्या विषयांबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कामगाराच्या प्रश्नांबाबतही गंभीरतेने निर्णय घेण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. यावेळेस येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या या दौऱ्यात पालघर जिह्याचे प्रमुख सल्लागार कुंदन संखे यांच्यासह विभागीय सचिव प्रशांत गावडे, विभागीय अध्यक्ष सुनील मेस्त्री, कार्याध्यक्ष मोहन पाटील, कोषाध्यक्ष नरेश संखे तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पालघर जिल्ह्यातील एस टी प्रवाशांच्या व कामगारांच्या बऱ्याच समस्या आमच्याकडे आल्या होत्या, त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून सदरचा दौरा आखला गेला होता, जिल्ह्याचे विभाग नियंत्रक यांच्याकडे याबाबत सविस्तर चर्चा झाली असून एस टी सेवा लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती पाऊले त्वरित उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुंदन संखे
प्रमुख सल्लागार, महाराष्ट्र राज्य एस टी कामगार सेना, पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here