पालघर: मजुराला मारहाण करणे पडले महाग; तहसीलदार सुनील शिंदे सक्तीच्या रजेवर

0
524

पालघर – योगेश चांदेकर:

पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील तहसिलदार अयुब तांबोळी यांच्याकडे पालघर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबत कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड यांनी शुक्रवारी उशीरा आदेश काढला आहे. पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी परराज्यातील मजूराला मारहाण केल्याचा एक्स्क्लुजिव्ह व्हिडीओ मुंबई ई न्यूजने प्रसारित करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान पालघर जिल्हा प्रशासनाकडून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या कामगारांसाठी 3 विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. एकाच दिवसात तीन गाड्या असल्याने आर्यन हायस्कूलच्या मैदानावर टोकन गोळा करण्यासाठी कामगारांची गर्दी झाली होती. एकाच दिवशी ३ रेल्वेगाड्या आयोजित केल्याने मोठी गर्दी होईल याचा प्रशासनाला अंदाज नसेल काय? गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन उपस्थित असताना मजुरांवर हात उचलण्याचा तहसीलदारांना अधिकार कुणी दिला असा प्रश्न मुंबई ई न्यूजने उपस्थित केला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वच स्तरांतून उचलून धरले गेले. सुनील शिंदे यांच्या या कृत्याचा सर्वांनीच निषेध करत कारवाईची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here