अफवांचे सत्र सुरूच, चोर समजून इसमाला ४० जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण

0
404

पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही चोर आल्याच्या अफवांचे पेव कायम असून थांबण्याचे नाव घेत नाही. डहाणू तालुक्यातील पाच दिवसांपासूनच्या दोन धक्कादायक घटनांनंतर शुक्रवारी रात्री पुन्हा डहाणू तालुक्यातील घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाई दुबलपाडा येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या एका इसमाला चोर समजून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

घोलवड पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी रात्री ११ वाजता तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या इसमाचा जीव वाचविला. यावेळी जवळपास ४० जणांचा जमाव घटनास्थळी होता अशी माहिती घोळवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here