वाईन शॉपसह या गोष्टी तात्काळ सुरु करा – राज ठाकरे

0
10235

मुंबई:

राज्य सरकारने महाराष्ट्रातील वाईन शॉप्स सुरु करावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर एक तोडगा म्हणून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे वाईन शॉप्स सुरु करण्याची मागणी केलेली आहे.

राज्याचा महसूल सुरु ठेवण्यासाठी काही व्यवसाय सुरु ठेवण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये. महाराष्ट्रातील वाईन शॉप्स सुरु ठेऊन राज्याच्या महसुलाची तजबीज करता येऊ शकते म्हणून कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीये. दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझा उद्देश नाही असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या आवर्जून म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here