पालघर-योगेश चांदेकर

पालघर-डहाणू विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार पास्कल धनारे यांनी निवडणूक उमेदवारी अर्ज डहाणू येथे शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी शिवसेनेचे व भाजपाचे शेकडो कार्यकर्ता सहभागी झाले. पास्कल धणारे यांचा उमेदवारी अर्जा दाखल केल्यानंतर पक्षातर्फे डमी उमेदवार भाजपा तालुका अध्यक्ष विनोद मेढा याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
भाजपचे विद्यमान आमदार पास्कल जाणारे यांना युतीतर्फे पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे यावेळी डहाणू आणि तलासरी तालुक्यातून कार्यकर्त्यांनी सहभागी होत संपर्क कार्यालयाजवळ गर्दी केली. त्यानंतर पारनाका ते प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांनी आदिवासी तारपा वाद्यावर ठेका धरला. यावेळी शिवसेनेचे संतोष शेट्टी, भाजपाच्या अर्चना वाणी, बापजी काठोळे,विजय खरपडे, भरत राजपूत, लुईस काकड, सुरेश शिंदा,सुरेंद्र निकुंभ इत्यादीचा उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर केला. निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा 7 वा दिवस असून एकूण 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 4 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी निवडणूक उमेदवारी अर्ज छाननी झाल्यानंतर 7 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.त्यानंतर डहाणू विधानसभेतील निवडणूकचे चित्र स्पष्ट होणार असले तरी डहाणू विधानसभेत सध्या तरी दुरंगी लढत होण्याचे चिन्ह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here