संजीवन छावणीत तपासणी शिबीर ; ४३ बालकं छावणीत दाखल

खाजगी डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकीचे विवेक पंडितांकडून कौतुक

0
1279

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-श्रमजीवी संघटना आणि विठुमाऊली चॅरिटेबल संचालित बालसंजीवन छावणी जव्हार येथे आज कुपोषित बालकांच्या तपासणीचे शिबीर घेण्यात आले. यावेळी 124 बालकांची तपासणी बालरोगतज्ज्ञ डॉ.वर्षा भोसले आणि डॉ.आशिष भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली. विशेष म्हणजे आपली प्रकृती ठीक नसताना डॉ.वर्षा भोसले या स्वतः मुंबईतून जव्हार प्रवास करून येऊन या बालकांना उपचार देत असल्याचे दिसल्या, भोसले दांपत्याचा खाजगी वैद्यकीय व्यवसाय  असूनही सेवा भावी वृत्तीने जपलेली सामाजिक बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार यावेळी विठू माऊली ट्रस्टचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी यावेळी काढले.
जव्हार मोखाड्या मधील कुपोषित बालक, गरोदर माता व स्तनदा मातांना छावणीत दाखल करून त्यांना साधारण स्तितीत येइपर्यंत योग्य आहार आहारतज्ञांच्या मार्फत पुरविणे आणि त्यांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढून सदृढ बनविणे या उद्देशाने येथे बाल उपचार केंद्राचे काम सुरू आहे.
बालकांना छावणीत दाखल करण्यासाठी तपासणी करून घेऊन केली कॅम्पमधेय एकूण 124 मुलांची तपासणी झाली, तपासणीसाठी जव्हार कुटीरशाह उपजिल्हा रुग्णालयातून, आरोग्य विभाग तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचेही आवश्यक ते सहकार्य मिळाले. तपासणी झालेल्या बालकांना यावेळी औषध आणि पूरक आहार देण्यात आली.  डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे 43 बालकांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी 45 अतितीव्र कुपोषित, 51 तीव्र कुपोषित तर 28 नॉर्मल बालकांना तपासण्यात आले. यातील एका बालकाची प्रकृती बरी नसल्याने त्याला जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संजीवन छावणीत नर्सिंग प्रशिक्षण सुरू 
आज संजीवन छावणीत नर्सिंगचे प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया पूर्ण  करण्यात आली ,या प्रशिक्षणासाठी 26 विद्यार्थिनी नर्सिंग साठी प्रवेश घेतला. अत्यंत गरीब घरातून आलेल्या या तरुणींमध्ये सामाजिक बांधीलकीची जाणीव ओळखून त्यांची निवड केली जाते. या मुलींना रोजगार आणि त्यांच्याकडून रुग्णसेवा व्हावी या दुहेरी उद्देशाने हे मोफत प्रशिक्षण सुरू केले असल्याचे विवेक पंडित यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विवेक पंडित यांनी पूर्ण दिवस या बालकांमध्ये व्यतीत केला. सोबत श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, श्रमजीवी कामगार संघटनेचे सरचिटणीस ज्ञानेश्वर शिर्के, उल्हास भानुशाली,अजित गायकवाड, सीता घाटाळ, स्नेहा घरत,कमलाकर भोरे, संतोष धिंडा, जमशेद खान, वसंत वाझे,रेणुका दाखणे,  रेणुका सुरुम, वैशाली खोदे, तुलशा कोगील, साधना ताई इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले, यावेळी ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील, विजय राऊत, उद्योजक विनित मुकणे, मितेश पंड्या, शिवसेनेचे प्रकाश निकम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी श्रमजीवी विक्रमगड तालुका अध्यक्ष तुषार सांबरे, पौर्णिमा पवार,मेहुल पटेल आणि टीम ने आयुष्यमान योजनेचे फॉर्म भरण्याचा कॅम्प देखील घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here