पालघर: 50 चा सॅनिटायझर चक्क 190 रुपयांना; सॅनिटायझर वाटपात होतोय भ्रष्टाचार?

0
384

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबणाने वारंवार हात धुण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. केंद्र व राज्य सरकारने लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्याची परवानगी दिली आहे. खरेदीतील संभाव्य भ्रष्टाचाराचा धोका ओळखून केंद्र सरकारने सॅनिटायझर, मास्क यांसारख्या वस्तूंचे दर निश्चित केले आहेत. तसेच नफेखोरी करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलली जात आहेत.

मात्र पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना वाटण्यासाठी मागविण्यात आलेल्या 50 रुपये MRP असणाऱ्या हँड सॅनिटायझर बॉटलवर चक्क 190 रुपये MRP चे स्टिकर लावण्यात आले असल्याचा एक्सक्लुजीव व्हिडीओ मुंबई ई न्यूजच्या हाती लागला आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 200ml हँड सॅनिटायझरची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातच प्रेसिला कंपनीत तयार होणाऱ्या 100ml हँड सॅनिटायझर बॉटलची कंपनीकडून छापण्यात आलेली किंमत 50 रुपये इतकी आहे. असे असताना त्यावर 190 चा स्टिकर कुणी लावला आहे? त्यामागचा उद्देश काय? हा माल ग्रामपंचायतने किती रुपयांना खरेदी केला? एकूण किती सॅनिटायझर मागवण्यात आला? यामध्ये काही अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्या आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here