कोकण मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट

Mumbai E News Network : तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह, मुंबई अग्निशमन दल, वीज वितरण कंपन्यांसह सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटीही परत आणल्या आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी बंद ठेवला आहे, तर दहिसर आणि वांद्रे कुर्ला संकुलातल्या कोविड उपचार केंद्रांमधल्या रुग्णांना सुरक्षितरित्या दुसऱ्या ठिकाणी हलवलं आहे.

मुंबईतल्या सर्व चौपाट्यांवर लाइफ गार्डसह, अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. याशिवाय किनारपट्टी लगतच्या आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराची गरज निर्माण झाली तर त्यादृष्टीनं तात्पुरत्या निवाऱ्यांची सज्जताही ठेवली आहे. या ठिकाणी अन्न, पाण्यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबल सिंग चहल यांनी दिले आहेत.

चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचं नुकसान झालं, किंवा समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी वाहून आल्याचं दिसलं तर मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. यासाठी किनारपट्टीलगतच्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागानं जाहीर केले आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका आणि इतर साधनं सुरक्षित ठेवावीत.

नौका मालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी. जिवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक साधनसामुग्री सोबत बाळगावी, असं आवाहन विभागानं केलं आहे.

Mumbai e News

Email - mumbaienews@gmail.com Contact - 9890086328

Share
Published by

Recent Posts

जाणून घ्या कोरफडीचे आरोग्यवर्धक फायदे; रस व तेल करते चमत्कार..!

मुंबई ई न्यूज वेब टीम: वाचकहो आम्ही आपल्यासाठी बातम्यांसोबतच इतर महत्वपूर्ण दर्जेदार माहिती घेऊन येत असतो. 'आजीबाईचा बटवा' (aajibaicha batava)… Read More

3 weeks ago

पालघर: पेसा निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या ‘त्या’ ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईसाठी मुहूर्त सापडेना?

डहाणू प्रतिनिधी - विनायक पवार: डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेती/वरोती ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांनी पेसाच्या निधीत भ्रष्टाचार केल्याची तक्रार… Read More

7 months ago

पालघर: मुदतबाह्य सॅनिटायजर वाटप प्रकरणी ‘त्या’ ग्रामसेवकास कारवाईचा झटका

जव्हार प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे खु. येथे मुदतबाह्य सॅनिटायजर वाटपाबाबत प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने गट… Read More

8 months ago

पालघर : गंजाड मणिपूर येथील खदानीच्या तलावात बुडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

डहाणू प्रतिनिधी : जितेंद्र पाटील - डहाणू तालुक्यात एका विद्यार्थ्यांचा गंजाड मणिपूर येथील खदानी मध्ये पोहायला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची… Read More

8 months ago

पालघर: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ तीन अपत्य असणाऱ्या संचालकाचे पद धोक्यात?

तलासरी प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्च महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत कृषी पतपुरवठा मतदार… Read More

8 months ago

पालघर: धक्कादायक! पाण्याच्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील केमिकलमिश्रित राख? नागरिकांच्या जीवाशी खेळ..

पालघर प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने असलेल्या कासा-भराड सूर्या कालव्यामध्ये कल्लू ढाबा येथून वाहणाऱ्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत… Read More

8 months ago